Mansukh Hiren Case : एटीएस आणि एनआयएच्या टीमकडून रेतीबंदरची पाहणी
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ATS आणि NIA च्या टीमने मुंब्रा येथील रेतीबंदरची पाहणी केली. मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणीच मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. या ठिकाणी दोन्ही पथकांनी येऊन पाहणी केली. ATS चं पथक संध्याकाळी ६ च्या दरम्यान या ठिकाणी आलं होतं त्यांनी रेतीबंदर या ठिकाणी येऊन पाहणी केली. ATS चं पथक या ठिकाणी […]
ADVERTISEMENT

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ATS आणि NIA च्या टीमने मुंब्रा येथील रेतीबंदरची पाहणी केली. मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणीच मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. या ठिकाणी दोन्ही पथकांनी येऊन पाहणी केली. ATS चं पथक संध्याकाळी ६ च्या दरम्यान या ठिकाणी आलं होतं त्यांनी रेतीबंदर या ठिकाणी येऊन पाहणी केली. ATS चं पथक या ठिकाणी आलं त्यांनी या ठिकाणचे काही फोटो काढले. त्यानंतर ते पथक गेलं.
त्यानंतर ७.३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान एनआयएचं पथक या ठिकाणी पोहचली होती. त्यांच्यासोबत चार गाड्या होत्या. एनआयएच्या टीमने घटनास्थळी येऊन काही फोटो काढले तसंच काही मोबाईल व्हीडिओ शूटही केलं. त्यानंतर ५ ते सात मिनिटांनी हे पथकही निघून गेलं. एटीएस किंवा एनआयए यांच्यापैकी कोणत्याही पथकाने सीन रिक्रिएट केला नाही.
मनसुख हिरेन प्रकरण : एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल
काय आहे प्रकरण?