राज्यात २४ तासात ७ हजार ८०० पेक्षा जास्त Corona रुग्ण पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात आज ७ हजार ८६३ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. मात्र सोमवारी आणि आज महाराष्ट्रात ही संख्या अल्प प्रमाणात का होईना पण कमी झाल्याचं दिसतं आहे. आज दिवसभरात ६ हजार ३३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आज ७ हजार ८६३ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. मात्र सोमवारी आणि आज महाराष्ट्रात ही संख्या अल्प प्रमाणात का होईना पण कमी झाल्याचं दिसतं आहे. आज दिवसभरात ६ हजार ३३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा ९३.८९ टक्के इतका झाला आहे.
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
आज राज्यात ५४ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला राज्यातील मृत्यू दर हा २.४१ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६४ लाख २१ हजार ८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण २१ लाख ६९ हजार ३३० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५५ हजार ७८४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ५८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.