नागपूर महापालिकेकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा
नागपूर: तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली. मात्र, आता हा टप्पा सुरु होताच नागपूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लाभार्थी हे लसीकरणाला कसा प्रतिसाद देतील याची शंका सरकारला होती. पण नागपूर मध्ये तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला […]
ADVERTISEMENT

नागपूर: तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली. मात्र, आता हा टप्पा सुरु होताच नागपूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लाभार्थी हे लसीकरणाला कसा प्रतिसाद देतील याची शंका सरकारला होती. पण नागपूर मध्ये तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि लसीकरण केंद्रावर गर्दी झाली व त्यामुळेच नागपूर महानगरपालिकेकडे आता दीड ते दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध आहे. (nagpur municipal corporation has shortage of corona vaccine)
नागपूर महानगरपालिकेकडे सध्या 15 हजार डोज साठा शिल्लक आहेत. दररोज दहा हजार डोज लागत असल्याने पुढील दोन दिवस पुरेल इतकाच साठा नागपूर महापालिकेकडे आहे. मात्र असं असलं तरीही लसीकरणात कोणताही खंड पडणार नसल्याचं अतिरिक्त मनपा आयुक्तांनी सांगितलं आहे. लसीचा साठा संपल्यास इतर ठिकाणावरून लस मागवण्यात येईल पण लसीकरण बंद पडू देणार नाही अतिरिक्त मनपा आयुक्तांनी म्हटलं आहे.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या लसीकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे:
-
सध्या नागपूर शहरात शासकीय 18 ठिकाणी तर 37 खाजगी केंद्रावर लसीकरण सुरू आहे.