देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार होते, त्यांचे सगळे फटाके भिजलेले निघाले-नवाब मलिक
देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार होते अशी त्यांनी गर्जना केली होती. मात्र आज त्यांची पत्रकार परिषद मी पाहिली त्यांचे सगळे फटाके भिजलेले निघाले. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मी कोणत्याही बॉम्बस्फोटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडून कवडी मोल दराने जमीन खरेदी केलेली नाही. आज देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्यांना त्यांच्या गुप्तहेरांनी चुकीची माहिती दिली आहे. हसीना […]
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार होते अशी त्यांनी गर्जना केली होती. मात्र आज त्यांची पत्रकार परिषद मी पाहिली त्यांचे सगळे फटाके भिजलेले निघाले. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मी कोणत्याही बॉम्बस्फोटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडून कवडी मोल दराने जमीन खरेदी केलेली नाही. आज देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्यांना त्यांच्या गुप्तहेरांनी चुकीची माहिती दिली आहे.
हसीना पारकरला मी ओळखत नाही. सलीम पटेलचा जो उल्लेख केला आहे, तो फरार आहे. आम्ही कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही. गोपीनाथ मुंडेही असेच आरोप करत होते. मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचे फटाके भिजलेले होते असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांनी फटाके वाजवले पण त्यांचा आवाजच आला नाही.
आणखी काय म्हणाले मलिक?
आम्ही दीड लाख फूट जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी आरोप केला. खोटे भाडेकरु ठेवल्याचा आरोप केला. त्या दीड लाख फूट जमिनीची पाहणी करा. त्या जागेवर शेख मदिनातुल्ल अमान हाऊसिंग सोसायटी आहे.1984 मध्ये तिथ इमारत बांधण्यात आली. ती मुनिरा पटेल यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देऊन 140 लोकांना घरं दिली. त्याच्या मागे जमीन आहे त्यावर झोपडी आहे. तिथं जमीन आहे तिथं सॉलिडस कंपनीकडं जमीन आहे.