आर्यन खानच्या अटकेनंतर NCB चे ‘सिंघम’ समीर वानखेडे पुन्हा चर्चेत, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी आहे खास नातं
शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूजवर छापेमारी करत NCB ने ७-८ जणांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलं. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळचं वळण लागलं आहे. NCB ने ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई केली असून त्यात आर्यन खानचाही समावेश आहे. NCB ने ही कारवाई […]
ADVERTISEMENT

शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूजवर छापेमारी करत NCB ने ७-८ जणांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलं. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळचं वळण लागलं आहे. NCB ने ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई केली असून त्यात आर्यन खानचाही समावेश आहे.
NCB ने ही कारवाई आपले विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यामुळे पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये वानखेडे यांचं नाव चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्जमाफीयांविरुद्ध मोहीम उघडलेले समीर वानखेडे आहेत तरी कोण हे आज जाणून घेऊयात…
क्रूजवर छापेमारी करताना समीर वानखेडे स्वतः त्यात सहभागी झाले होते. याआधी अभिनेता सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात अनेक ड्रग्जमाफीयांची नावं समोर आली होती. यानंतर वानखेडेंच्याच मार्गदर्शनाखाली NCB ने मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करुन कारवाई केली होती. या नंतर वानखेडे यांना सिंघम अशी पदवी मिळाली असून बॉलिवूडमध्ये त्यांच्या नावाची दहशत असल्याचं बोललं जातंय.
कोण आहेत समीर वानखेडे?