Sameer Wankhede: समीर वानखेडेंना NCB मध्ये पुन्हा मुदतवाढ, आर्यन खानच्या अडचणी वाढणार?
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 6 महिने तरी ते याच पदावर कायम राहणार आहे. त्यांना मिळालेली ही मुदतवाढ आता बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासाठी अधिक अडचणीची ठरु शकते. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान हा सध्या तुरुंगात असून त्याच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 6 महिने तरी ते याच पदावर कायम राहणार आहे. त्यांना मिळालेली ही मुदतवाढ आता बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासाठी अधिक अडचणीची ठरु शकते. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान हा सध्या तुरुंगात असून त्याच्या अटकेत समीर वानखेडे यांची महत्त्वाची भूमिका होती.
समीर वानखेडे यांना मिळालेल्या मुदतवाढीमुळे क्रूझ ड्रग्स प्रकरण त्यांना तडीस लावत येणार आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान याला 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये समीर वानखेडे यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळेच आता समीर वानखेडे यांना मिळालेली मुदतवाढ ही आर्यन खानसाठी डोकेदुखी ठरू शकते.
जाणून घ्या समीर वानखेडे?
महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्राविण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.