नागालॅंडमध्ये पवारांचा चमत्कार; विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता

मुंबई तक

Nagaland assembly Election Result : महाराष्ट्रात कायमच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राष्ट्रवादीला थेट ईशान्येत मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप (BJP) युतीला इथून ३७ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर ३ नंबरवरील जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nagaland assembly Election Result :

महाराष्ट्रात कायमच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राष्ट्रवादीला थेट ईशान्येत मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप (BJP) युतीला इथून ३७ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर ३ नंबरवरील जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. त्यामुळे ६० जागांच्या विधानसभेत पवारांच्या पक्षाचा आता थेट विरोधी पक्षनेता होणार आहे. (NCP has won 7 seats in Nagaland Legislative Assembly. Second rank votes have been received in 5 seats)

देशात आज विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीचे वारे वाहत आहेत. नागालॅंड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या सर्व निवडणुकांसाठी २६ आणि २८ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. याच मतदानाची मतमोजणी आज पार पडली.

Ramdas Athawale यांचा ईशान्येत करिश्मा; नागालँडमध्ये RPI(A) दोन जागांवर विजयी

हे वाचलं का?

    follow whatsapp