पेट्रोल आणि डिझेलचे पुन्हा महागलं, १२ दिवसात दहावेळा दरवाढ

मुंबईत पेट्रोल ११७ रूपये प्रति लिटरच्याही वर
पेट्रोल आणि डिझेलचे पुन्हा महागलं, १२ दिवसात दहावेळा दरवाढ

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर १ एप्रिलला स्थिर राहिले. मात्र आज गुढीपाडव्याच्या दिवशीही दरांमध्ये वाढ झाली आहे. १२ दिवसातली ही दहावी दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर ८० पैसे वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोल ११७.५७ रूपये प्रति लिटरवर पोहचलं आहे तर डिझेल १०१.७० रूपये प्रति लिटर झालं आहे. दिल्लीतही एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६१ रूपये झाली आहे तर डिझेल ९३.८७ रूपये प्रति लिटरवर गेलं आहे.

पुन्हा कडाडलं पेट्रोल आणि डिझेल
पुन्हा कडाडलं पेट्रोल आणि डिझेलफोटो-इंडिया टुडे

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट केले जातात. त्यानुसार भारतीय कंपन्या या इंधनाची किंमत ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महाग झालं की देशातही पेट्रोल डिझेल महाग होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल २६ टक्क्यांनी स्वस्त झालं आहे तरीही पेट्रोल आणि डिझेल यांच्या राष्ट्रीय बाजारातल्या किंमती वाढत आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यापासून निकालापर्यंत म्हणजेच सुमारे १३७ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या होत्या. मात्र आता मागच्या बारा दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दहा दिवस वाढल्या आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले
पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले (प्रातिनिधिक फोटो)

देशातल्या प्रमुख तीन शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती

मुंबई

पेट्रोल - ११७.५७ रुपये प्रति लिटर

डिझेल - १०१.७९ रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल - १०२.६१ रुपये प्रति लिटर

डिझेल - ९३.८७ रुपये प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल - ११२.१९ रुपये प्रति लिटर

डिझेल - ९७.०२ रुपये प्रति लिटर

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची माहिती अपडेट करतात. नोव्हेंबरपासून भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. पण आता त्यांना पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती अशा पद्धतीने जाणून घ्या:

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज समजू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in