बलात्कार पीडितेचं जगणं झालंय मुश्कील, ‘तो’ Video व्हायरल झाल्याने 5 वर्षापासून पीडिता घरातच

मुंबई तक

मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: पाच वर्षापूर्वी झालेल्या बलात्काराने एक पीडित मुलगी इतकी भेदरलेली आहे की तिने घराच्या बाहेर जाणंच बंद केलं आहे. धक्कादायक म्हणजे, अत्याचार करतानाचा व्हीडिओ आरोपीने व्हायरल केल्याने अनेक ओळखीच्या लोकांकडे हा व्हीडिओ पोहचला आहे. यामुळेच पीडित मुलीने बाहेर जाणं बंद केलं आहे. व्हायरल व्हीडिओमुळे पीडित मुलीच्या मागे टवाळ मुलं लागतात. लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: पाच वर्षापूर्वी झालेल्या बलात्काराने एक पीडित मुलगी इतकी भेदरलेली आहे की तिने घराच्या बाहेर जाणंच बंद केलं आहे. धक्कादायक म्हणजे, अत्याचार करतानाचा व्हीडिओ आरोपीने व्हायरल केल्याने अनेक ओळखीच्या लोकांकडे हा व्हीडिओ पोहचला आहे. यामुळेच पीडित मुलीने बाहेर जाणं बंद केलं आहे.

व्हायरल व्हीडिओमुळे पीडित मुलीच्या मागे टवाळ मुलं लागतात. लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अखेर घराबाहेर टोमणे आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने गेली पाच वर्षे ही मुलगी घराबाहेरच पडली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अंबरनाथ मध्ये राहणारी या 17 वर्षीय अल्पवयीन पीडिता ही आरोपी अजमल याच्या जीन्स पॅकिंग कंपनीत कामाला होती. मात्र, त्याच्याकडील काम सोडून पीडिता दुसऱ्या कंपनीत कामाला जाऊ लागली होती. याचाच राग मनात धरुन आरोपीने बदलापूर कोंडेश्वर भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला हातो. यावेळी आरोपी अजमल मलिक याने अत्याचार करतानाचा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट केला होता.

तसेच हा व्हीडिओ दाखवून तुझी बदनामी करेन असे धमकी दिल्याने पीडितेने आपल्यावरील अत्याचाराची माहिती घरच्यांना दिली नव्हती. मात्र, काही दिवसांनी तिचा हा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले. अखेर पीडितेने घरच्यांना याची माहिती दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp