पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल असं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. संत आणि ज्योतिषी यांच्या मते पुढच्या २० ते २५ वर्षात अखंड भारत होईल. मात्र आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर पुढच्या १५ वर्षांमध्ये अखंड […]
ADVERTISEMENT

पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल असं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. संत आणि ज्योतिषी यांच्या मते पुढच्या २० ते २५ वर्षात अखंड भारत होईल. मात्र आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर पुढच्या १५ वर्षांमध्ये अखंड भारत होईल असं मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये म्हटलं आहे.
हिंदूंना हिंदू राहायचं असेल, तर भारताला अखंड बनवावंच लागेल -मोहन भागवत
मोहन भागवत यांनी हरिद्वार या ठिकाणी आल्यानंतत त्या ठिकाणी परमार्थ निकेतनचे चिदानंद सरस्वती यांनी भारतीय वेदांत संमेलनात मोहन भागवत यांची भेट घेतली. स्वामी चिदानंद सरस्वती यांनी मोहन भागवत यांना ३ जून रोजी परमार्थ निकेतन यांना आमंत्रित केलं आहे.