नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी; सचिन सावंतांनी दिला राजीनामा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दहा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र काँग्रेसचं प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या नाराजीतून हा राजीनामा सचिन सावंत यांनी दिला आहे अशीही चर्चा रंगली आहे. सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षांपासून जास्त काळ प्रवक्ते होते. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या ट्विटर पेजवरूनही त्यांनी प्रवक्ता असल्याचं हटवलं आहे. सचिन सावंत हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आत्तापर्यंत अनेकदा काँग्रेसची बाजू आपल्या परिने लावून धरली आहे. टीव्ही शो असतील किंवा आंदोलनं असतील त्या सगळ्या ठिकाणी सचिन सावंत यांनी काँग्रेसची बाजू उचलून धरली होती. एक उत्तम प्रवक्ते म्हणून सचिन सावंत यांची ओळख होती. मात्र त्यांनी आज आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. सचिन सावंत हे एक प्रभावी प्रवक्ते म्हणून ओळखले जात. त्यांचे ट्विटही चांगलेच सूचक आणि विरोधी पक्षाला तिखट वाटतील असेच असायचे. आता याच सचिन सावंत यांनी राजीनामा दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना जबाबदा-यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी माजी मंत्री सुनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.

सोशल मीडिया विभागाची जबाबदारी विशाल मुत्तेमवार यांच्याकडे व निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी रमेश शेट्टी यांची व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्याकडे देण्यात आली आहे. जी यादी आज जाहीर करण्यात आली आहे त्या यादीत सचिन सावंत याचं नाव कुठेच नाही त्यामुळे सचिन सावंत नाराजी व्यक्त करत आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

ADVERTISEMENT

नाना पटोले यांची नियुक्ती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी झाल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. नाना पटोले यांनी स्वबळावर सत्तेत येण्याचंही भाष्य अनेकदा केलं आहे. अशात त्यांनी आज आपली टीम जाहीर केली त्यात सचिन सावंत यांचं नाव नव्हतं. त्यामुळेच सचिन सावंत यांनी नाराज होऊन आपलं पद सोडल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT