साईबाबा मंदिर होणार खुलं; कुणाला दिला जाणार प्रवेश?, दर्शनासाठीची नियमावली जाहीर
अनेक दिवसांच्या मागणीनंतर राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑक्टोबरपासून मंदिरं खुली होत असून, श्री साईबाबा समाधी मंदिरही दर्शनासाठी खुलं होणार आहे. मात्र, नियमांची पूर्तता करणाऱ्या भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मंदिरात दररोज १५ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून, १० वर्षाखालील मुलं, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व […]
ADVERTISEMENT

अनेक दिवसांच्या मागणीनंतर राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑक्टोबरपासून मंदिरं खुली होत असून, श्री साईबाबा समाधी मंदिरही दर्शनासाठी खुलं होणार आहे. मात्र, नियमांची पूर्तता करणाऱ्या भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
मंदिरात दररोज १५ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून, १० वर्षाखालील मुलं, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्यक्ती तसेच मास्क न वापरणाऱ्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
कुणाला दिला जाणार मंदिरात प्रवेश?
– ७ ऑक्टोबर २०२१ रोजी काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुलं करण्यात येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाईल. यापैकी १० हजार ऑनलाईन पास (५ हजार सशुल्क व ५ हजार निशुल्क) व ५ हजार निशुल्क व सशुल्क ऑफलाईन पासेस असतील.