Sakinaka Rape Case: आरोपीविरुद्ध Atrocity चा गुन्हा दाखल, प्रमुख हत्यारही जप्त - आयुक्त हेमंत नगराळेंची माहिती

सरकारी वकील राजा ठाकरे मांडणार पोलिसांची बाजू
Sakinaka Rape Case: आरोपीविरुद्ध Atrocity चा गुन्हा दाखल, प्रमुख हत्यारही जप्त - आयुक्त हेमंत नगराळेंची माहिती

संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणात तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पीडित महिला ही एका विशिष्ठ समाजाची असल्यामुळे आरोपीविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून २० लाखांची मदत जाहीर केली जाणार आहे.

जाणून घ्या काय म्हणाले पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?

साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासात सोशल मीडियावर काही चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी ही परिषद घेण्यात आली आहे. “पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अ‍ॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आपण आरोपीला अटक केली असून २१ तारखेपर्यंत कस्टडीत आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारी वकील राजा ठाकरे मांडणार कोर्टात बाजू -

घटनास्थळी पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला यानंतर आरोपी पळून कसा गेला या सर्वांची पुराव्यासकट माहिती पोलिसांकडे आली आहे. आरोपीने या गुन्ह्यात वापरलेलं मुख्य हत्यारही पोलिसांनी जप्त केलंय. या गुन्ह्यात सरकारी वकील राजा ठाकरे पोलिसांना मार्गदर्शन करत असून ते कोर्टात पोलिसांची बाजू मांडणार आहेत.

पीडितेच्या कुटुंबाला २० लाखांची मदत -

नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. आज दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार व इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर या विषावर चर्चा झाली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in