अमित शाह-शरद पवार भेटीबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात भेट झाली की नाही हे मला ठाऊक नाही. मात्र देशाच्या गृहमंत्र्याना जर शरद पवार भेटले असतील तर त्यात गैर काय? त्यांना कुणीही भेटू शकतं. कोणत्याही कामासाठी अमित शाह यांना कुणीही भेटू शकतं. उद्या आम्हाला वाटलं तर आम्हीही त्यांना भेटू शकतो त्यात चुकीचं काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. अमित शाह यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की सगळ्याच गोष्टी उघड करत नसतात. अमित शाह हे बोलले ते योग्य असेलही.. पण बंद दरवाजाच्या आड झालेल्या गोष्टी नंतर बाहेर आल्याच होत्या. अशा बैठका झाल्या तर त्या काही गुप्त राहणार नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला.

शरद पवार, प्रफुल पटेल अहमदाबादमध्ये कोणाला भेटले?

विरोधकांनी आरोपांचे रंग उधळू नयेत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विरोधकांनी उगाच आरोपांचे रंग उधळू नयेत. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही आरोप भाजपने केलं आहे त्यामुळे राज्याची बदनामी होते आणि वाईट वाटतं. धुळवडीच्या दिवशी एवढंच सांगेन की की विरोधकांनी उगाच असे आरोप करू नयेत. मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. विरोधकांना कोणताच रंग नाही ते बेरंग आहेत त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत प्रेमाची होळी खेळावी. उठसूठ आरोपांचे रंग उडवू नये. महाराष्ट्राचं सरकार पडणार नाही, कुणीही तंगड्यात तंगडं अडकवू नयेत. महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीची बातमी म्हणजे अफवा – नवाब मलिकांचं स्पष्टीकरण

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याचं कळतंय. पवार आणि पटेल यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी भेट झाली. महत्त्वाचं म्हणजे पवार आणि पटेल यांचा हा दौर पूर्वनियोजित होता. केवडिया येथील साखर संमेलनात दोघंही सहभागी होणार होते. याच दरम्यान शरद पवार आणि अमित शाह यांची एकमेकांशी भेट झाली आहे अशी बातमी समोर आली. या भेटीमध्ये काय चर्चा झाली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्रात धुळवड साजरी होत नसली तरीही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय धुळवड खेळणार का? अशा बातम्या येण्यास सुरुवात झाली. या सगळ्या घडामोडींबाबत संजय राऊत यांना विचारलं असता अमित शाह यांना कुणी भेटलं तर त्यात गैर काय? असा प्रश्न विचारला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT