‘लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार’; देवेंद्र फडणवीसांचं युतीबद्दल मोठं विधान
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याती महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार […]
ADVERTISEMENT

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याती महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं सर्वोच्च न्यायालयाने कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. त्यामुळेच मी म्हणतोय की, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. तुम्ही विचार करत आहात, त्याआधी विस्तार करू.”
सुनावणी घेण्याचे अधिकार सचिवांना दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माहिती असतानाही जेव्हा राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते, त्यावेळी असं सांगितलं जातं. हे अधिकार अर्धन्यायिक प्रकरणाच्या सुनावणी दिले गेले आहेत.”
“गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते. त्यापूर्वीच्या आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना ते अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही, देशात परंपरा आहे. अर्धन्यायिक प्रकरणाचे सुनावणीचे अधिकार सचिवांना दिले जातात. बाकी कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. सरकार जनतेचं आहे. जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहे. जनतेचे लोकच मंत्रिमंडळाचे निर्णय घेतील.”