एसटी संप असो की अमरावती घटना हे सगळे महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न-संजय राऊत

एसटी संप असो की अमरावती घटना हे सगळे महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न-संजय राऊत

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामध्ये तेल ओतण्याचं काम करतं आहे हे सगळ्यांना माहित आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. मात्र त्यांना भडकवलं जातं आहे. महाराष्ट्रात आग कोण लावतं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शरद पवार यांच्यासबोत अनेक विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील, राजकीय आणि एसटी संपासह विविध विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. परमबीर सिंहांबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करावी, इतका मोठा आणि गंभीर विषय नाही. राज्यात इतरही महत्वाचे विषय आहेत. त्या विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल, याची मला खात्री आहे. एसटी संपाबाबतच्या आपल्या भूमिकावरुन शरद पवार यांनी परिवाहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर एसटी संपाबाबत तोडगा निघेल, शी आशा आहे,असे संजय राऊत म्हणाले. ‘एसटी संपला राजकीय वळण लागलेय, अनिल परब यांच्या निवासस्थानी शाईफेक झाली. शाईफेक करणारे एसटी कर्मचारी नव्हते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतेय? आणि का भडकवतेय? त्यामागील हेतू काय आहे, हे सर्वांना माहित आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण आणि का करतेय? यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न आमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. ‘

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी सर्वांना सहानभूती आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करता येईल, ते सरकार करतेय. सोमवारी शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यामध्ये या विषयावर चर्चा झाली आहे. आज शरद पवार यांच्यासोबत झालेल्य बैठकीत मला असं समजलं की, शरद पवार यांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

नवीन वर्षांमध्ये राज्यातील सरकार जाणार आहे आणि गुढी पाडव्याला राज्यात नवीन सरकार येणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले, याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘ हे सरकार जाईल म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे. त्यांना बोलत राहू द्या. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानं सरकार जात नाही, हे सर्वांना माहित आहे. ते भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष आहेत. त्यांना असं बोलणं गरजेचं आहे. हे सरकार पुढील 25 वर्ष टीकेल असा विश्वास आहे. ’ पहाटेच्या शपथीविधीला आज दोन वर्ष झाले आहेत. याच शपथविधीचे झटके चंद्रकांतदादा पाटील यांना बसत असतील असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in