आर्यन खान जेलमध्ये गेल्याचं दुःख वाटतं, आमचं काय? ST कर्मचाऱ्यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. अपुरं आणि वेळेवर न मिळणारं वेतन यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकीकडे कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजु होण्याचे आदेश दिले असले तरीही अनेक भागांमध्ये आंदोलन सुरुच आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील शासनाच्या धोरणांवर टीका करत संघटना विरहीत बेमुदत संपाची घोषणा केली आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. अपुरं आणि वेळेवर न मिळणारं वेतन यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकीकडे कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजु होण्याचे आदेश दिले असले तरीही अनेक भागांमध्ये आंदोलन सुरुच आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील शासनाच्या धोरणांवर टीका करत संघटना विरहीत बेमुदत संपाची घोषणा केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचं शासनात तात्काळ विलीनीकरण करावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी भाऊबिजेच्या मुहुर्तावर पहाटेपासून संप पुकारला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सरकारवर टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला शरद पवार तयार नाहीत. आर्यन खान जेलमध्ये गेल्याचं दुःख सुप्रिया सुळेंना वाटतं पण आमच्या कर्मचाऱ्यांचं दुःख वाटत नाही का असा उद्विग्न सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होईल असं पहावं अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. सगळीकडे दिवाळीचा आनंदोत्सव सुरु असताना आमच्या लेकरांना कपडे नाहीत, वेळेवर पगार नाही यामुळे दिवाळी साजरी तरी कशी करायची असा प्रश्न यावेळी कर्मचाऱ्यांनी विचारला. सगळीकडे फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा होत असताना आमच्याकडे फटाके फोडण्याइतकेही पैसे नसल्याचं यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितलं.