नांदेड जिल्ह्यात दहा महिन्यात 119 शेतकऱ्यांची आत्महत्या; दिवाळीच्या तोंडावर बळीराजा संकटात
नांदेड जिल्ह्यात मागील दहा महिन्यात तब्बल ११९ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना बळीराजा मात्र आसमानी संकटात सापडला आहे. सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकं भुईसपाट झाली आहेत तर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारला शासनाकड़ून मदत मिळाली नाही, यामुळे आता दिवाळी […]
ADVERTISEMENT
नांदेड जिल्ह्यात मागील दहा महिन्यात तब्बल ११९ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना बळीराजा मात्र आसमानी संकटात सापडला आहे. सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकं भुईसपाट झाली आहेत तर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारला शासनाकड़ून मदत मिळाली नाही, यामुळे आता दिवाळी कशी साजरी करावी,असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकलाय.
ADVERTISEMENT
नांदेड जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात 119 तर चार महिन्यात 68 शेतकऱ्यांचा आत्महत्या
एकीकडे राज्य सरकारने शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केलेली असताना आत्महत्या थांबत नसल्याचे चित्र आहे. मराठवाडयातील नांदेड जिल्हयात दहा महिन्यात 119 तर, या चार महिन्यात 68 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा जुनच्या सुरवातीपासूनच मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. पिकांना जगवणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.
हे वाचलं का?
अतिवृष्टीचा 6 लाख शेतकऱ्यांना फटका
नांदेड जिल्हयात 3 लाख 58 हजार 731 हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. यात सहा लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सार्वधिक नुकसान किनवट तालुक्यात झाले असून सुमारे 49 हजार 332 हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तुर, मूंग, उडीद हे पिके भुईसपाट झाली आहेत. त्याखालोखाल हिमायतनगर तालुक्याचा नंबर लागत असून या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.
ADVERTISEMENT
परतीच्या पावसानं आहे त्या पिकांचं ही नुकसान
ADVERTISEMENT
नदीकाठवरील शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. आजूनही हिमायतनगर, किनवट, माहूर या भागात शेतात पाणी साचलेले दिसून येते. लागवडीचा खर्चही निघणे शक्य नसून घेतलेले बँकेसह खासगी सावकाराचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत शेतकरी आहेत. मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांना नापिकीला तोंड द्यावं लागत आहे. त्यात आता पुन्हा परतीच्या पावसाने ज्यांच्याकडे शिल्लक पिक आहे तेही खराब झाले आहे.
सरकारच्या मदतीकडे लक्ष
विजयादशमीपासून नांदेड जिल्ह्यात दररोज मध्यम ते हलक्यास्वरूपात पाऊस पडत आहे.त्यामुळे शेतशिवारात पाणी साचून राहत आहे. सोयाबीन काढणीला अडथळा निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटत असल्याचे चित्र आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरती स्वतःच्या डोळ्याने शेतकरी आपला दिवाळा निघताना पाहत आहे. अनेक शेतकरी सहन होत नसल्याने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. त्यामुळं अशा भागातील शेतकऱ्यांकडे सरकारने मदतीचं हात देणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT