एकतर्फी प्रेमातूनच कबड्डीपटू मुलीची हत्या : मुख्य आरोपीसह चार जणांना बेड्या
मंगळवारी सायंकाळी बिबवेवाडीत कबड्डी खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनं खळबळ उडाली असून, आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्याबद्दल संतप्त भावना व्यक्त होत आहे. दरम्यान एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडलं असल्याचं समोर आलं असून, पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील बिबवेवाडी येथे आठवीत शिक्षण घेणारी 14 वर्षीय […]
ADVERTISEMENT
मंगळवारी सायंकाळी बिबवेवाडीत कबड्डी खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनं खळबळ उडाली असून, आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्याबद्दल संतप्त भावना व्यक्त होत आहे. दरम्यान एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडलं असल्याचं समोर आलं असून, पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
पुण्यातील बिबवेवाडी येथे आठवीत शिक्षण घेणारी 14 वर्षीय क्षितिजा व्यवहारे ही मुलगी मंगळवारी सायंकाळी कबड्डीच्या सरावासाठी आली होती. मैत्रिणीसोबत यश लॉन्सवर कबड्डी खेळत असताना क्षितिजाच्या नात्यातील हृषिकेश ऊर्फ शुभम भागवत हा त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवरून तिथे आला. कबड्डी खेळत असलेल्या क्षितिजावर त्याने काही समजण्याच्या आतच कोयता आणि चाकूने हल्ला केला.
पुणे : मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेलीये; अजित पवारांना संताप अनावर
हे वाचलं का?
अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात क्षितिजा गंभीर जखमी झाली. यावेळी आरोपीने तिथे असलेल्या तिच्या मैत्रिणींना धमकी देऊन पळवून लावलं आणि स्वतःही फरार झाला. या घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं पुणे शहरात पसरलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर क्षितिजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत ती गतप्राण झाली होती.
पुणे हादरलं! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज
ADVERTISEMENT
या प्रकरणापासून मुख्य आरोपीसह तिन्ही आऱोपी फरार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली. आरोपी ह्रषिकेश भागवतसह चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
ADVERTISEMENT
याप्रकरणाची माहिती देताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, ‘ही घटना प्रेमकरणातून घडलेली आहे. त्याचं एकतर्फी प्रेम होतं. काल सायंकाळी त्यांनी घटनास्थळी जाऊन आणि मुलीला बाजूला घेऊन हत्या केली. हत्येत सहभागी असलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.
‘आरोपींची रिमांड घेतली जाईल. पुरावे जमा करुन लवकरात लवकर आरोपपत्र दाखल कऱण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे. प्रकरण फास्ट ट्रॅकला आणून लवकरात लवकर निकाल लागेल, यासाठी प्रयत्न करु असंही आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT