मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहातील 169 कैद्यांना देण्यात आली कोव्हिड प्रतिबंधक लस
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई मध्यवर्ती (आर्थर रोड) कारागृहात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्या माध्यमातून १६९ कैद्यांचं लसीकरण आज (दिनांक १ जून २०२१) करण्यात आले आहे. विहित ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. देशभरात COVID 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु […]
ADVERTISEMENT

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई मध्यवर्ती (आर्थर रोड) कारागृहात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्या माध्यमातून १६९ कैद्यांचं लसीकरण आज (दिनांक १ जून २०२१) करण्यात आले आहे. विहित ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
देशभरात COVID 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर लस घेण्यासाठी नागरिकांना सरकारने विहित केलेले ओळखपत्र सादर करावे लागते. मात्र, ज्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारचे विहित ओळखपत्र नाही, असे काही नागरिकही आढळत आहेत. उदाहरणार्थ बेघर व्यक्ती, साधू-संत, कारागृहातील बंदीवान, सुधारगृहात राहणाऱ्या व्यक्ती, मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये राहणारे नागरिक, वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिक, रस्त्याच्या कडेला राहणारे याचक आदी प्रकारातील काही नागरिकांकडे प्रसंगी ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले.
अशा नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारातील नागरिकांकडे ओळखपत्र नसल्यास त्यांच्याशी संबंधीत शासकीय विभाग, संघटना, बिगर शासकीय संस्था इत्यादींच्या सहकार्याने अशा नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सविस्तर मार्गदर्शक असे निर्देश देखील केंद्र सरकारद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत.
मुंबईत खासगी हॉस्पिटल सोसायट्यांमध्ये करणार लसीकरण