भयंकर! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार; इगतपुरी-कसारादरम्यान घडली घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महिलांवरील अत्याचारांचा प्रश्न ज्वलंत बनलेला असतानाच आणखी एक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकणाऱ्यांनी एका 20 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, चाौघांचा शोध घेतला जात आहे. मात्र, खळबळ उडवणाऱ्या या घटनेनं महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ADVERTISEMENT

प्राथमिक माहितीनुसार, लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत प्रवाशांना लुटले. 15 ते 20 प्रवाशांना यावेळी लुटण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली.

इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

15 ते 20 प्रवाशांना दरोडेखोरांनी लुटलं. दरोडेखोरांनी प्रवाशांचे पैसे आणि इतर किमती मुद्देमाल हिसकावून घेतला. अचानक लुटमार सुरू झाल्यानं बोगीत भितीचं वातावरण निर्माण झालं. प्रवाशांना लुटत असतानाच दरोडेखोरांची नजर प्रवास करत असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर गेली.

नागपूर हादरलं! मित्रानेच केला घात; 17 वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार

ADVERTISEMENT

दरोडेखोरांनी तिला आपल्या वासनेची शिकार केलं. धावत्या ट्रेनमध्ये त्यांनी पीडितेवर बलात्कार केला. या कृत्यानंतर दरोडेखोरांनी गाडीतून पोबारा केला. हा सर्व प्रकार इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील NCB अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणात दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच लोहमार्ग पोलिसांनी चार आरोपींनी अटक करण्यात आली आहे. सध्या अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात असून, इतर चार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. 8 आरोपींपैकी 7 इगतपुरीमध्ये राहणारे आहेत, तर 1 मुंबईच्या मालवणीमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT