Gujrat | Morbi : मोरबी पूल दुर्घटनेत ६० जणांचे मृतदेह हाती; अद्यापही शेकडो लोक पाण्यातच!
मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेत आतापर्यंत ६० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती राजकोटचे खासदार मोहनभाई कुंदारिया यांनी दिली. मृतांमध्ये लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असल्याचही कुंदारिया यांनी सांगितलं. तसंच घटनास्थळावर पाणी उपसण्यासाठी मशीन्स आणण्यात आल्या असून अद्यापही शेकडो लोकांचं बचावकार्य सुरु आहे. यात आणखी काही मृतदेह मिळण्याची […]
ADVERTISEMENT
मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेत आतापर्यंत ६० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती राजकोटचे खासदार मोहनभाई कुंदारिया यांनी दिली. मृतांमध्ये लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असल्याचही कुंदारिया यांनी सांगितलं. तसंच घटनास्थळावर पाणी उपसण्यासाठी मशीन्स आणण्यात आल्या असून अद्यापही शेकडो लोकांचं बचावकार्य सुरु आहे. यात आणखी काही मृतदेह मिळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
Machinery present at the spot to pump out the water so that we can figure out the bodies underneath, as there's a lot of silt. I believe the bridge got overloaded and that led to the incident. Many teams engaged in rescue, CM to arrive shortly: BJP MP Mohanbhai Kalyanji Kundariya
— ANI (@ANI) October 30, 2022
मच्छू नदीवरील १४० वर्षपूर्वीचा जुना केबल पूल तुटल्याने रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुमारे ४०० जण नदीत पडल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर लोकांना नदीपात्राबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबतच स्थानिक नागरिक देखील बचावकार्यात उतरले आहेत. याशिवाय या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून ५ जणांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
#WATCH | Several people feared to be injured after a cable bridge collapsed in the Machchhu river in Gujarat's Morbi area today
PM Modi has sought urgent mobilisation of teams for rescue ops, while Gujarat CM Patel has given instructions to arrange immediate treatment of injured pic.twitter.com/VO8cvJk9TI
— ANI (@ANI) October 30, 2022
दरम्यान, दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांना स्वतः परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास, बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री पटेल यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
PM @narendramodi spoke to Gujarat CM @Bhupendrapbjp and other officials regarding the mishap in Morbi. He has sought urgent mobilisation of teams for rescue ops. He has asked that the situation be closely and continuously monitored, and extend all possible help to those affected.
— PMO India (@PMOIndia) October 30, 2022
ADVERTISEMENT
मोरबीचा पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले. 1880 मध्ये सुमारे 3.5 लाख खर्चून हा पूल पूर्ण झाला होता. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते.
अनेक वर्षांचा हा पूल असल्याने मागील ६ महिन्यांपासून तो नुतनीकरणासाठी सामान्य लोकांना बंद ठेवण्यात आला होता. मात्र याच महिन्यातील 25 ऑक्टोबर रोजी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. आज रविवार असल्यामुळे पूलावर प्रचंड गर्दी होती. सेल्फी काढण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासमवेत पूलावर आले असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT