महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 159 नवे Corona रूग्ण, 165 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 159 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 7 हजार 839 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 60 लाख 8 हजार 750 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.33 टक्के इतकं आहे. दिवसभरात 165 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 159 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 7 हजार 839 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 60 लाख 8 हजार 750 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.33 टक्के इतकं आहे. दिवसभरात 165 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 2.9 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 60 लाख 68 हजार 435 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 37 हजार 755 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 521 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 3 हजार 795 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज घडीला 94 हजार 745 सक्रिय रूग्ण राज्यात आहेत.
आज राज्यात 8 हजार 159 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 62 लाख 37 हजार 755 इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई – 10 हजार 474
ADVERTISEMENT
ठाणे- 12 हजार 87
ADVERTISEMENT
पुणे- 15 हजार 566
सांगली- 10 हजार 674
कोल्हापूर – 10 हजार 49
नाशिक- 1 हजार 207
अहमदनगर- 3 हजार 634
औरंगाबाद- 699
नागपूर- 1 हजार 686
महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधली सक्रिय रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर हे लक्षात येतं की अजूनही पाच जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली आणि कोल्हापूर ही ते पाच जिल्हे आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही आहे. तसंच दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आणि कोव्हिड प्रोटोकॉल पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT