उस्मानाबाद: छोट्या मुलाचं नाव ‘पंतप्रधान’, मोठ्याचं राष्ट्रपती; या पठ्ठ्याने तर कमालच केली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गणेश जाधव, उस्मानाबाद

ADVERTISEMENT

सध्याच्या आधुनिक युगात आपला चिमुकल्या बाळांची नावं आगळ्या – वेगळ्या स्वरुपाची ठेवली जातात. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील दत्ता व कविता चौधरी यांनी आपल्या मुलाचे नाव चक्क ‘पंतप्रधान’ असे ठेवले आहे. नुकतंच नामकरण विधी पार पडला त्यावेळी चौधरी दाम्पत्याने आपल्या या नवजात बालकाचं नाव पंतप्रधान असं ठेवलं. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ‘राष्ट्रपती’ आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती व पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत.

ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा पाळणा सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपारिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारुन त्याचं नाव ठेवतात.

हे वाचलं का?

अलीकडच्या काळात राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह आधुनिक नावे बाळाला देण्यात येतात. परंतु आता घटनात्मक दर्जा असलेल्या पदांची नावे देण्याची नवी पध्दत रुढ होऊ पाहत आहे. याची प्रचिती दत्ता व कविता चौधरी याच्या कुटुंबातील नामकरण सोहळ्याने समोर आली आहे.

जेव्हा त्याच्या दुसऱ्या मुलाची नामकरणाची वेळ आली तेव्हा चौधरी यांनी दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलाचे जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर येथील महानगरपालिकेतून ‘पंतप्रधान दत्ता चौधरी’ या नावाने जन्म प्रमाणपत्र घेणार आहेत.

ADVERTISEMENT

चौधरी दाम्पत्याने 19 जून 2020 रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. तसे आधारकार्डही त्यांनी बनविले आहे. तर 10 नोव्हेंबर 2021 रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव ‘पंतप्रधान’ ठेवले आहे.

ADVERTISEMENT

सध्या संपूर्ण देशात राजकीय रस्सीखेच होत असल्याचं वातावरण दिसत आहे. तरी चौधरी कुटुंबात मात्र राष्ट्रपती व पंतप्रधान हे मात्र एका छताखाली एकत्र वाढणार आहेत. मुलांची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवल्याने भविष्यात त्या मुलांना राष्ट्रपती व पंतप्रधान करेल अशी प्रतिज्ञाही दत्ता चौधरी यांनी केला आहे.

पाहा ‘राष्ट्रपती’ आणि ‘पंतप्रधान’ यांचे वडील काय म्हणाले

‘दोन्ही मुलांचं असं नाव ठेवण्यामागे एवढंच उद्दिष्ट आहे की, पहिल्या मुलाला मला राष्ट्रपती करायचं आहे आणि दुसऱ्या मुलाला पंतप्रधान करायचं आहे. नावाप्रमाणे मुलं काही बनत नाही ही जी म्हण आहे ती मला मोडीत काढायची आहे.’

‘मी अशी प्रतिज्ञा घेतली आहे… स्वप्न नाही पाहिलंय प्रतिज्ञा घेतलीय. पहिल्या मुलाला राष्ट्रपती करणारच आणि दुसऱ्या मुलाला पंतप्रधान करणार. तसे संस्कार मी त्यांना देणार आहे.’ असं दत्ता जाधव यावेळी म्हणाले.

प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

दरम्यान, घटनात्मक पदाची नावे ठेवण्याचा हा पायंडा आगामी काळात मात्र कायदेशीर पेच निर्माण करणाराही ठरू शकतो. तसंच या मुलांना देखील त्यांच्या भावी शैक्षणिक आयुष्यात अडचणीचा ठरु शकतो. मात्र, असं असलं तरी सध्या या दोन्ही मुलांची नावं ही राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशीच आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT