“सुप्रिया सुळे भिकार#$”, 50 ‘खोके’वरून अब्दुल सत्तारांची अर्वाच्य भाषेत टीका
शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्यानं ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती. सुप्रिया सुळेंच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य उत्तर दिलंय. त्यामुळे सत्तार पुन्हा एकदा वादात सापडलेत. शिवसेनेत झालेलं बंड आणि त्यानंतर घडलेलं सत्तांतर याचे पडसाद अजूनही राज्यात उमटताहेत. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी गुवाहाटीला […]
ADVERTISEMENT

शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्यानं ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती. सुप्रिया सुळेंच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य उत्तर दिलंय. त्यामुळे सत्तार पुन्हा एकदा वादात सापडलेत.
शिवसेनेत झालेलं बंड आणि त्यानंतर घडलेलं सत्तांतर याचे पडसाद अजूनही राज्यात उमटताहेत. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० कोटी म्हणजे ५० खोके घेतल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार हा आरोप होतोय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिंदे गटातल्या आमदारांना लक्ष्य करताना ५० खोके एकदम ओकेवरून डिवचलं होतं. सुप्रिया सुळेंच्या टीकेबद्दल शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लाघ्य शब्दात उत्तर दिलंय.
अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.