अदानी डाटा नेटवर्कला मिळाला फुल टेलिकॉम सर्व्हिससाठीचं लायसन्स; अंबानींच्या जिओसोबत होणार स्पर्धा?

स्वानंद बिक्कड

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्कला अ‍ॅक्सेस सेवांसाठी युनिफाइड परवाना मिळाला आहे. म्हणजेच आता ही कंपनी देशातील सर्व दूरसंचार सेवा पुरवण्यास सक्षम झाली आहे. देशात अलीकडेच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता.

ADVERTISEMENT

अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करताना सांगितले होते की ते त्यांच्या डेटा केंद्रांसह त्यांच्या सुपर अॅप्ससाठी एअरवेव्ह वापरण्याची योजना करत आहेत. हे वीज वितरणापासून विमानतळ आणि बंदरांपर्यंत गॅसच्या किरकोळ विक्रीला समर्थन देईल. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अदानी डेटा नेटवर्क्सला यूएल (एएस) देण्यात आले आहे. सोमवारी हा परवाना अदानी समूहाला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. पण याबाबत अदानी ग्रुपकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

मुकेश अंबानींशी थेट स्पर्धा?

हे वाचलं का?

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोघे उद्योगपती गुजरातचे आहेत. आतापर्यंत दोन्ही गट वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि त्यांच्यात थेट स्पर्धा नाही. मुकेश अंबानींचा रिलायन्स समूह तेल, रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्सपासून दूरसंचार आणि किरकोळ क्षेत्रांपर्यंत काम करतात.

त्याचवेळी, अदानी समूह बंदर, कोळसा, हरित ऊर्जा, वीज वितरण आणि विमान वाहतूक क्षेत्रात आहे. परंतु अलीकडच्या काळात अदानी समूहाने पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश केला असताना रिलायन्स समूहानेही हरित ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता दूरसंचार क्षेत्रात अदानी समूहाचा प्रवेश ही या दोघांमधील पहिली थेट स्पर्धा असणार आहे.

ADVERTISEMENT

नुकतंच भारतात 5G ची सुरुवात

ADVERTISEMENT

नुकतंच भारतात 5G ची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी मोबाईल काँग्रेस परिषदेत 5G चा शुभारंभ केला होता. त्यात आता अंबानींचा जिओ, एरटेल यांनी काही शहरांमध्ये 5G सुरु केलं आहे. येणाऱ्या दोन वर्षात भारतात सर्वत्र 5G सेवा आम्ही पूर्वी असं अंबानी म्हणाले होते. 5G च्या स्प्रेक्ट्रम लिलावात उद्योगपती गौतम अदानींनी देखील उडी घेतली होती. त्यामुळे अदानी देखील टेलिकॉम क्षेत्रात झेप घेऊ इच्छितात हे समोर आलं होतं. आता त्यांना युनिफाइड परवाना मिळाला आहे. त्यामुळे आता किती लवकर अदानी टेलिकॉम बाजारात एंट्री करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT