कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतरही तीन दिवस उपचार, नांदेडमधील रुग्णालयात धक्कादायक प्रकार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना अनेक शहरांत आजही रुग्णालयात बेड मिळत नाहीयेत. काही ठिकाणी रुग्णालयं परिस्थितीचा उत्तम सामना करत उपचार करत असताना काही भागांत रुग्णालयांकडून मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरु आहे. नांदेडच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही हॉस्पिटल प्रशासन ३ दिवस त्याच्यावर उपचार करण्याचं कारण देत त्याच्या पत्नीकडून पैसे उकळत राहिल्याचा धक्कादायक […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना अनेक शहरांत आजही रुग्णालयात बेड मिळत नाहीयेत. काही ठिकाणी रुग्णालयं परिस्थितीचा उत्तम सामना करत उपचार करत असताना काही भागांत रुग्णालयांकडून मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरु आहे. नांदेडच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही हॉस्पिटल प्रशासन ३ दिवस त्याच्यावर उपचार करण्याचं कारण देत त्याच्या पत्नीकडून पैसे उकळत राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नांदेडमधील हिंगोली गेट परिसरात असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पेशाने शिक्षक असलेल्या अंकलेश पवार यांचा कोरोनामुळे उपचार घेत असताना मृत्यू झाला. परंतू हॉस्पिटल प्रशासनाने पुढचे तीन दिवस त्यांच्यावर उपचार असल्याचं दाखवत त्यांच्या पत्नीकडून १ लाख ४० हजार रुपये उकळले. हॉस्पिटल प्रशासनाला याबद्दल जाब विचारला असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतू अखेरीस न्यायालयात धाव घेतल्यानंतर गोदावरी हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय घडला प्रकार?









