‘त्या सात जणांमध्ये एकनाथ शिंदेही होते’; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार भडकले
-योगेश पांडे, नागपूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महिना लोटून गेला मुहूर्त लागलेला नाही. त्यावरून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही हा मुद्दा उपस्थित केला होता. आता याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सामना बघायला मिळतोय. मागच्या सरकारचं मंत्रिमंडळ पाच […]
ADVERTISEMENT

-योगेश पांडे, नागपूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महिना लोटून गेला मुहूर्त लागलेला नाही. त्यावरून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही हा मुद्दा उपस्थित केला होता. आता याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सामना बघायला मिळतोय. मागच्या सरकारचं मंत्रिमंडळ पाच जणांचं होतं, या फडणवीसांच्या विधानावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे दौऱ्यावर आहेत. दौऱ्याला सुरूवात करण्यापूर्वी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला.
अजित पवार म्हणाले,”मी ज्या दिवशी दौऱ्याला सुरूवात केली. त्यादिवशी त्यांना भेटलो होतो. काही प्रश्न मांडले होते. माझ्यासोबत रोहित पवारही होते. आम्हाला जे काही पाहायला मिळत आहे. अजून पंचनामे झालेले नाहीत. आम्ही त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत. मला प्रशासनाची माहिती असल्यानं सत्तेत आणि विरोधी बाकांवर असताना काय केलं पाहिजे याची कल्पना आहे.”