नागपूर : 15 वर्षीय वेदांतला अमेरिकेतील कंपनीने का दिली 33 लाखांची ऑफर?
योगेश पांडे, नागपूर हल्ली किशोरवयीन मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट्स यांसारख्या गॅजेट्सचं व्यसन जडलं आहे. त्यामुळे पालकांसाठी हा विषय चिंतेचा बनला आहे. मात्र, नागपूरच्या 15 वर्षीय वेदांतला मोबाईल आणि लॅपटॉपमुळे चक्क 33 लाखांच्या नोकरीची ऑफर आली आहे. आणि ही साधीसुधी कंपनी नसून अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात ही किमया दाखवल्याने वेदांताचे मोठे कौतुक […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, नागपूर
हल्ली किशोरवयीन मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट्स यांसारख्या गॅजेट्सचं व्यसन जडलं आहे. त्यामुळे पालकांसाठी हा विषय चिंतेचा बनला आहे. मात्र, नागपूरच्या 15 वर्षीय वेदांतला मोबाईल आणि लॅपटॉपमुळे चक्क 33 लाखांच्या नोकरीची ऑफर आली आहे. आणि ही साधीसुधी कंपनी नसून अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात ही किमया दाखवल्याने वेदांताचे मोठे कौतुक होत आहे. तर आपण नेमकं वेदांतने असं काय केलं की, त्याला अमेरिकेच्या कंपनीने लाखोंची जॉब ऑफर दिली आहे, ते पाहूया.
लॉकडाऊन काळाचा सदपयोग
वेदांत राजू देवकाते हा नागपूरच्या रमणा मारुती परिसरात राहतो. सध्या तो शहरातीलच शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि शाळा बंद झाल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. शाळा बंद असल्याने घरात बसूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं. मात्र, याच कालावधीचा वेदांतने सोन्यासारखा वापर करून घेतला. वेदांतने लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत घरातील जुन्या लॅपटॉपच्या मदतीने यूट्यूबवर सॉफ्टवेअर संबंधित अनेक कोर्सेसचे शिक्षण घेतले.
युट्यूबच्या माध्यमाने शिकला सॉफ्टवेअर कोडिंग
युट्यूबवरून त्याने सॉफ्टवेअर कोडिंगच शिक्षण घेतलं. अवघड असणारी सॉफ्टवेअर कोडिंग त्याने शिकली, ते ही युट्यूबच्या माध्यमाने. आईच्या जुन्या लॅपटॉपवर तो हे सगळं शिकत होता. एकेदिवशी त्याला वेबसाइट डेव्हलपमेंट स्पर्धेची माहिती मिळाली. त्याने कुणालाही न सांगता त्या स्पर्धेत भाग घेतला आणि दोन दिवसांत 2,066 ओळींचे कोडिंग केले. एक हजार सॉफ्टवेअर डेव्हलपरला मात देत त्याने ही स्पर्धा जिंकली.