पातेलंभर तूप आणि ३०-३५ पुरणपोळ्या, अमृता फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांचं गुपित
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यशस्वी बँकर सोबतच अमृता फडणवीस यांनी गायनातली आपली आवडही चांगल्याच पद्धतीने जोपासली आहे. झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या असताना त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांचं एक गुपित सर्वांना सांगितलं. देवेंद्र फडणवीसही या […]
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यशस्वी बँकर सोबतच अमृता फडणवीस यांनी गायनातली आपली आवडही चांगल्याच पद्धतीने जोपासली आहे. झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या असताना त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांचं एक गुपित सर्वांना सांगितलं.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी पत्नी सुगरण आहे की आई, असा कोड्यात टाकणारा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारल्यामुळे भल्याभल्यांची फिरकी घेणारे फडणवीसही बुचकळ्यात पडले. एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांना ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, सजग आई, प्रेमळ सून, बँकर, गायिका अशी अमृता यांची लांबलचक ओळख सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने करुन दिली. आमच्या फ्रिजमधून मध्यरात्री पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी चौकशी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रिज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रिजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं. हा भाग आज रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
हे वाचलं का?
या कार्यक्रमात महाराजांच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुगली टाकली. “माझी आई आणि बायको जेवण बनवतात, आणि विचारतात, कोणाचं चांगलं झालंय, तेव्हा पंचाईत होते. तर तुम्ही मला सांगा, की तुमच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, आणि अमृताताईंच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, मुळात आवडतो की नाही?”
यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना अगदी सावध भूमिका घेतली. प्रशांतजी असे प्रश्न कधीच विचारु नयेत. कोणी विचारलंच, तर लक्षात ठेवावं, की आईला म्हटलं, की तुझ्यापेक्षा पत्नीच्या हातचा एखादा पदार्थ जास्त आवडतो, तर आईला कधीच राग येत नाही. याच्या उलट केलं, तर जगणं मुश्किल होऊ शकतं. त्यामुळे असे प्रश्न विचारत जाऊ नका, असं फडणवीस म्हणताच प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे जोरात हसत सुटले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT