मला सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे जगायचंय, अमृता फडणवीसांची पोलिसांना विनंती

मुंबई तक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. वाय प्लस सुरक्षेबरोबर ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनही दिलं जाणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून देण्यात येणारी सुविधा घेण्यास अमृता फडणवीसांनी नकार दिलाय. काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक राजकीय नेत्यांची सुरक्षा काढून […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. वाय प्लस सुरक्षेबरोबर ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनही दिलं जाणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून देण्यात येणारी सुविधा घेण्यास अमृता फडणवीसांनी नकार दिलाय.

काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक राजकीय नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही जणांना सुरक्षा देण्यात आली. यात अमृता फडणवीस यांनाही सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात आलीये.

अमृता फडणवीस यांना वाय प्लस सुरक्षा देण्याबरोबरच ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनही देण्यात आलंय. त्याबद्दल अमृता फडणवीसांनी ट्विट करत भूमिका मांडलीये. अमृता फडणवीसांनी Traffic clearance vehicle घेण्यास नकार दिलाय. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांना विनंती केलीये.

अमृता फडणवीसांनी मुंबई पोलिसांना विनंती करताना काय म्हटलंय?

अमृता फडणवीसांनी मुंबई पोलिसांना विनंती करणारं ट्विट केलंय. हे ट्विट त्यांनी मुंबई पोलीस, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलंय. अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मला सर्वसामान्य मुंबईकराप्रमाणे जगायचं आहे. त्यामुळे माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, मला ट्रॅफिक क्लिअरन्स पायलट वाहन देऊ नका. वेगवेगळ्या विकासाकामांमुळे मुंबईतील ट्रॅफिकची स्थिती वैताग आणणारी आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच सुटका करतील, याची मला खात्री आहे’, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp