119 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी मराठा आरक्षण का दिलं होतं त्याचा एक भन्नाट किस्सा!

मुंबई तक

सध्या कोणतीही निवडणूक नाही, पण आरक्षणाच्या नावानं राज्यातलं राजकारण तापलंय. त्याला कारण आहे, सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिलेला निकाल. कोर्टानं मराठा समाजासाठीचं (Maratha Community) आरक्षण (Reservation) घटनाबाह्य ठरवलं. आणि नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण गेलं. मराठा समाजाच्या मागासलेपणावर प्रश्न विचारण्यात आले. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) जेव्हा आरक्षणाचं धोरण राबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

सध्या कोणतीही निवडणूक नाही, पण आरक्षणाच्या नावानं राज्यातलं राजकारण तापलंय. त्याला कारण आहे, सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिलेला निकाल. कोर्टानं मराठा समाजासाठीचं (Maratha Community) आरक्षण (Reservation) घटनाबाह्य ठरवलं. आणि नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण गेलं. मराठा समाजाच्या मागासलेपणावर प्रश्न विचारण्यात आले. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) जेव्हा आरक्षणाचं धोरण राबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी अल्पशिक्षित मराठा समाजालाही आरक्षण (Maratha Reservation) दिलं होतं.

26 जुलै 1902 ला राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर (Kolhapur) संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकऱ्यांतील 50 टक्के जागा राखीव, आरक्षित ठेवल्या. आरक्षणाबाबतचा हाच जाहीरनामा करवीर गॅझेटमधून प्रसिद्ध करण्यात आला होता.

शाहू महाराजांनी संस्थानातल्या 50 टक्के सरकारी नोकऱ्या या मागास जातींसाठी राखीव ठेवल्या. पण ब्राम्हण, पारशी, कायस्थ प्रभू, शेण्वी यासोबतच इतर काही कथित उच्चवर्णीय समाजाला यातून वगळण्यात आलं. म्हणजे शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं.

आता आपण इथं एक गोष्ट समजून घ्यायला हवी. ती म्हणजे, शाहू महाराजांनी तेव्हा संपूर्ण बहुजन समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय का घेतला? याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही इतिहासाचे अभ्यासक, शाहू महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक प्रा. इंद्रजीत सावंत यांना गाठलं. तेव्हा स्वतः कोल्हापूरकर असलेल्या सावंत यांनी तत्कालीन परिस्थिती आम्हाला उलगडून दाखवली.

हे वाचलं का?