मनसुख हिरेन हत्येप्रकरणात वाझे मुख्य आरोपी, एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचाही हात: ATS
ठाणे: मनसुख हिरने हत्याप्रकरणात महाराष्ट्र एटीएसने दोन जणांना अटक केल्याचं वृत्त काही वेळापूर्वी समोर आलं होतं. आता याच प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या हत्या प्रकरणात एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचा हात असल्याचा संशय एटीएसला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एक बुकी आणि एका माजी पोलीस कर्मचाऱ्याला एटीएसने अटक केली आहे. […]
ADVERTISEMENT

ठाणे: मनसुख हिरने हत्याप्रकरणात महाराष्ट्र एटीएसने दोन जणांना अटक केल्याचं वृत्त काही वेळापूर्वी समोर आलं होतं. आता याच प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या हत्या प्रकरणात एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचा हात असल्याचा संशय एटीएसला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एक बुकी आणि एका माजी पोलीस कर्मचाऱ्याला एटीएसने अटक केली आहे.
नरेश गोर (वय 31 वर्ष) हा एक बुकी अशून दुसरा आरोपी विनायक शिंदे हा आधी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल होता. 55 वर्षीय शिंदे हा लखन भैय्या एन्काउंटर केसमधील दोषी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पॅरोलवर होता.
दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने आपल्या प्रेस नोटमध्ये सचिन वाझे हेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं नमूद केलं आहे. सचिन वाझे यांना नरेश या बुकीकडून काही सिम कार्ड पुरवण्यात आले होते. जे या गुन्ह्यात वापरले गेल्याचं एटीएसने म्हटलं आहे.