ठाकरेंच्या सभेआधी संजय राऊतांचा शिंदेंवर ‘वार’, दादा भुसेंना दिला इशारा
Sanjay Raut Criticize Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची आज मालेगावात सभा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सत्तातरानंतर प्रथमच मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा होतेय. त्यामुळे या सभेकडे संपुर्ण महाराष्ट्रासह राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सभेपुर्वीच मालेगावचे वातावरण चांगलेच तापले आहे. मालेगावच्यासभेने काहिंची हातभर फाटलीय असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय […]
ADVERTISEMENT
Sanjay Raut Criticize Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची आज मालेगावात सभा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सत्तातरानंतर प्रथमच मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा होतेय. त्यामुळे या सभेकडे संपुर्ण महाराष्ट्रासह राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सभेपुर्वीच मालेगावचे वातावरण चांगलेच तापले आहे. मालेगावच्यासभेने काहिंची हातभर फाटलीय असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच दादा भूसेंना देखील त्या प्रकरणाचा हिशेब तयार ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सभेपुर्वीच वातावरण तापले आहे.(before udhhav thackeray meeting mp sanjay raut criticize shinde and warne dada bhuse)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या सभेपुर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. मालेगावच्या सभेकडे संपुर्ण देशाचे लक्ष आहे. ही सभा अशी आहे जिकडे भाड्याने कोणी येणार नाही. 300 रूपये 500 रूपये रोजावर जी माणसे आणली जातात, ती मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात, समोर कोण बोलतोय ते माहीत नाही, कशासाठी आलो ते माहित नाही, अशी टीका राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.
मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी; प्रकरण काय?
एखाद्या भाषेवरती बंदी आहे का, ऊर्दु ही भाषा नाही का? असा सवाल करत,कालच जावेद अख्तरांच कौतूक केलं.आम्हीही केलं. ज्या जावेद अख्तरांचा गुलझारांच कौतूक करतो ते उर्दुतच लिहतात, असे म्हणत त्यांनी उर्दु बॅनरवरील चर्चांना उत्तर दिले. तसेच सगळ्या जातीतले धर्मातले लोक सभेला येणार आहेत, म्हणून लक्ष भरकवीटल जात आहे, असेही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहे.
हे वाचलं का?
‘कोणाचीही सत्ता असो आपण पक्के’, अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या
दादा भूसेंनी हिशोब तयार ठेवावा
दादा भूसे यांनी गिरणा सहकारी कारखान्याचा 178 कोटीचा हिशोब तयार ठेवावा. त्यांनी आमच्याकडे पाहू नये, लोकं हिशेब मागतील, अशी टीका देखील संजय राऊत यांनी भूसे यांच्यावर केली. तसेच कोणत्याही दिशेला शिंदे यांनी सभा घ्यावी.काहीही होणार नाही कारण त्यांची दुर्दशा झालीय असाही टोला त्यांनी लगावला. पोलिसांनी मार्ग बदलण्याची सूचना केली असली तरी आम्ही त्याच मार्गाने येणार, आम्ही कधी सुरक्षा मागत नाही, आम्हाला कोणापासून धोका नाही, असे देखील राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
Mohammed Faizal: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या ‘खासदारकी’चा सुप्रीम कोर्ट करणार फैसला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT