राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रात तीन वर्ष पूर्ण : तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने सेलिब्रेशन

मुंबई तक

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून ३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये राजभवनात हे सर्व […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून ३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये राजभवनात हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांच्या तिसऱ्या वर्षपूर्ती निमित्त खालील पुस्तकांचे प्रकाशन होणार : 

१. राज्यपालांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित कॉफी टेबल पुस्तक ‘त्रैवार्षिक अहवाल : भगत सिंह कोश्यारी’ (राजभवनातर्फे प्रकाशित अहवाल)

२. ‘लोकनेता भगत सिंह कोश्यारी’ – रविकुमार आराक लिखित चरित्रात्मक मराठी पुस्तक   

३. ‘राज्यपाल के रूप में श्री भगत सिंह कोश्यारी के चुनिंदा भाषण’  संकलन – संपादन डॉ मेधा किरीट  

हे वाचलं का?

    follow whatsapp