भिवंडी : अल्पवयीन मोलकरणीवर मालकाकडून जंगलात बलात्कार
भिवंडी शहरात एका अल्पवयीन मोलकरणीवर मालकाने जंगलात बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती कळताच त्यांनी पुढाकार घेत गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी मालकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या वडिलांचं सहा वर्षांपूर्वी निधन झालं. ज्यानंतर तिची आईही तिला सोडून निघून गेली. यानंतर भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी […]
ADVERTISEMENT
भिवंडी शहरात एका अल्पवयीन मोलकरणीवर मालकाने जंगलात बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती कळताच त्यांनी पुढाकार घेत गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी मालकाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या वडिलांचं सहा वर्षांपूर्वी निधन झालं. ज्यानंतर तिची आईही तिला सोडून निघून गेली. यानंतर भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपीने या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नातवंडांचा सांभाळ आणि बकरी चरण्याच्या कामासाठी कामावर ठेवलं. मे महिन्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी जंगलात बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेलेली असताना मालकाने तिला मारुन टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
बारामती : लैंगिक समस्येने त्रस्त झालेल्या पतीने मित्रांना बायकोवर करायला लावला बलात्कार
हे वाचलं का?
या प्रकारानंतर पीडित मुलगी घाबरल्यामुळे मालकाकडून वारंवार असे प्रकार व्हायला लागले. १३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पाहिले असता तिला धक्काच बसला होता. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला पतीच्या कृत्यची हकीकत सांगितली. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते येथे पोहचले व तातडीने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता, तिच्यासोबत सेल्फी घेतलेला तरूण म्हणतो…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT