रजनी पाटील यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा; भाजपला मनवण्यात काँग्रेसला यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजीव सातव यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. कारण भाजपने संजय उपाध्याय यांनी दिलेली उमेदवारी मागे घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. काँग्रेसने केलेली ही शिष्टाई यशस्वी झाली आहे.

ADVERTISEMENT

संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे की, पक्षाच्या नेत्यांचा निर्णय मान्य करून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानतो. कोअर कमिटीच्या बैठकीत अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय झाला. काँग्रेस नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती, त्यानुसार आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची निर्णय घेतला असं उपाध्याय म्हणाले.

आज अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. जर भाजपने अर्ज माघारी घेतला नसता तर या एका जागेसाठी 4 ऑक्‍टोबरला मतदान होणार होतं. एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने आणि महाविकास आघाडीकडे तूर्तास बहुमत असल्याने निवडणूक फारशी अवघड नव्हती मात्र तरी यासाठी रिस्क न घेता काँग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांसोबत बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा केली होती.

हे वाचलं का?

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे अभिनंदन केले.

ADVERTISEMENT

नाना पटोले काय म्हणाले होते?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राची परंपरा ही आहे की एखाद्या नेत्याच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपने अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांना भेटीदरम्यान दिली ‘ही’ ऑफर

फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी माझी भेट घेतली. त्यांनी मला विनंती केली राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. यासंदर्भात मी त्यांना सांगितलं की आम्ही कोअर कमिटीसोबत चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ. बारा निलंबित आमदारांचा विषय वगैरे काहीही झालेला नाही. काहीजणांनी ही बातमी पेरली असावी. आमचा पक्ष हा संघर्ष करणारा आहे सौदेबाजी करणारा पक्ष नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमच्या बारा आमदारांसाठी आम्ही कोर्टात लढाई लढतो आहोत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT