काँग्रेसचं ‘मिशन नागपूर’! भाजपचा बालेकिल्ला फोडण्यासाठी संघ स्वयंसेवकाला घेतलं पक्षात
–योगेश पांडे, नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सातत्याने टीका करणाऱ्या काँग्रेसने बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या भाजपच्या नेत्याला पक्षात सामावून घेतलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संघाचे स्वयंसेवक असलेले डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी आज देवडिया काँग्रेस भवनात नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रवींद्र भोयर यांना विधान […]
ADVERTISEMENT
–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सातत्याने टीका करणाऱ्या काँग्रेसने बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या भाजपच्या नेत्याला पक्षात सामावून घेतलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संघाचे स्वयंसेवक असलेले डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी आज देवडिया काँग्रेस भवनात नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
रवींद्र भोयर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता असून, आयता उमेदवार उचलण्याची भाजपची चाल काँग्रेसकडून चालण्यात आल्याचं बोललं जात आहे.
हे वाचलं का?
MLC Election : विधानसभेवेळी डावललेल्या बावनकुळेंबद्दल भाजपाची भूमिका का बदलली?
छोटू भोयर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक आहे. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचं नागपुरातील रेशीमबाग येथील स्मृतिभवन असलेल्या परिसरातूनच ते भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. भोयर यांनी पक्षाला रामराम ठोकळ्यामुळे स्थानिक भाजपमध्ये मोठा भूकंप आल्याचे मानलं जात आहे. भोयर हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्तुत्वावर नाराज होते, अशीही चर्चा आता होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
MLC Election : विधानसभेला डावललेल्या बावनकुळेंना तिकीट; भाजपाचे 5 उमेदवार जाहीर
ADVERTISEMENT
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर विभागाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या ( 23 नोव्हेंबर) अखेरचा दिवस आहे. भोयर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा जरी काँग्रेस पक्षातर्फे अद्याप झालेली नसली, तरी डॉक्टर रवींद्र उर्फ छोटू भोयर हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील, असं कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
विधानपरिषद निवडणूक: भाजपची सारी भिस्त आयारामांवर, तीन उमेदवार तर मूळचे काँग्रेसी!
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतून राजहंस सिंह, कोल्हापुरातून अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल, नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-बुलडाणा वाशिम या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापैकी अमरीश पटेल, अमल महाडिक, राजहंस सिंह हे काँग्रेसमधून आलेले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT