भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या होणार ठाकरे घराण्याची सून

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे नेते आणि माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी ही लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. उद्धव ठाकरेंचे भाऊ बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता यांचा विवाह होणार आहे. हा विवाह सोहळा 28 डिसेंबरला पार पडणार आहे. या विवाहाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

ADVERTISEMENT

आज हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ या ठिकाणी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना 28 तारखेला होणाऱ्या विवाहाचं निमंत्रण दिलं आहे असंही समजतं आहे. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची भेट आज मुंबईत घेतली असं कॅप्शनही त्या फोटोला त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती असंही समजतं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव यांचा मुलगा निहार ठाकरे हे एलएलएमपर्यंत शिकले आहेत. त्यांनी वकिली पेशामध्ये आपला चांगला जम बसवला आहे. 1996 ला बिंदुमाधव यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरेंना खूप मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे निहार ठाकरेंचे चुलत काका आहेत.

हे वाचलं का?

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा विवाह सोहळा 28 डिसेंबरला मुंबईत पार पडणार असल्याची माहिती मिळतेय. मोजक्या लोकांच्या उपस्थितात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचं मूळ गाव असलेल्या बावडा वासियांसाठी पाटील यांनी 17 डिसेंबरला भोजन सोहळ्याचं आयोजन केलं आहे.

अंकिता पाटील कोण आहेत?

ADVERTISEMENT

अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

ADVERTISEMENT

2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT