पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा, भाजपची सरकारकडे मागणी

मुंबई तक

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलंच रंगताना दिसतं आहे. शरद पवारांचं नाव संजय राऊत यांच्या चार्जशीटमध्ये समोर आल्यानंतर आता भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलंच रंगताना दिसतं आहे. शरद पवारांचं नाव संजय राऊत यांच्या चार्जशीटमध्ये समोर आल्यानंतर आता भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणात गुरूआशिष कंपनीला काम देण्यात यावं यासाठी संजय राऊत यांनी त्यावेळी देशाचे कृषी मंत्री असेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी बैठक घेतली. या बैठकीला माजी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. मराठी माणसाला बेदखल करणाऱ्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेसोबत काय संबंध होता? याची पूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी गृहनिर्माण सचिवांचं विश्लेषण करणारं पत्र दिलं आहे. या पत्रावरून स्पष्ट होतं की म्हाडा प्राधिकरण असलं तरीही म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्यशक्तींचा दबाव होता. त्यामुळे चौकशीच्या या प्रकरणाचे धागे दोरे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत.

मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यामागचं खरं सत्य बाहेर येण्यासाठी यासंदर्भातली एक उच्चस्तरीत आणि कालब्ध मर्यादेची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp