भाजप खासदार उदयनराजेंचा ‘पुष्पा’ स्टाईल व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा भाजप खासदार उदयनराजे कधी काय करतील याचा नेम नाही.. त्यांनी आज पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ घालून फोटो सेशन केलं.. यावेळी त्यांना माध्यमांनी लुंगी घालण्याचे कारण विचारताच मला बरं वाटत असे सांगितले.. त्यांच्या सोबत इतर कार्यकर्त्यांनी देखील लुंगी परिधान केली होती..यावेळी गाडीत लावलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर उदयनराजें फिदा झाल्याचे […]
ADVERTISEMENT
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
भाजप खासदार उदयनराजे कधी काय करतील याचा नेम नाही.. त्यांनी आज पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ घालून फोटो सेशन केलं.. यावेळी त्यांना माध्यमांनी लुंगी घालण्याचे कारण विचारताच मला बरं वाटत असे सांगितले.. त्यांच्या सोबत इतर कार्यकर्त्यांनी देखील लुंगी परिधान केली होती..यावेळी गाडीत लावलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर उदयनराजें फिदा झाल्याचे दिसून आले.. सातारकरांना नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत पुन्हा एकदा त्यांनी कॉलर उडवली.. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात साताऱ्यातील उदयनराजेंचे चाहते लुंगी घालून दिसतील यात शंका नाही..
हे वाचलं का?
खासदार उदयनराजे पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते तेव्हा वाटेत सेल्फी पॉईंटवर त्यांच्या आगमनाची काही मंडळी वाट बघत बसली होती.त्यावेळी उदयनराजे सहकाऱ्यांसोबत कारमधून उतरले. तेव्हा त्यांचा लुक पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं कारण त्यांनी चक्क लुंगी परिधान केली होती. त्यानंतर राजे नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईलमध्ये सेल्फी पॉईंटवर गेले आणि तिथे फोटोसेशन केलं. यावेळी लुंगी का परिधान केली असं विचारलं असता राजे काही न बोलता कारमध्ये जाऊन बसले.
ADVERTISEMENT
कारमध्ये पुष्पा या सिनेमातलं सामी गाणं लागलं होतं. त्या गाण्यावर थोडासा ताल धरत, कॉलर उडवत आणि पुष्पाप्रमाणे हनुवटीवरून हात फिरवत उदयनराजेंनी आपला अनोखा अंदाज दाखवला. पुष्पा या सिनेमाने सगळ्याच प्रेक्षकांवर आपल्या शैलीचं गारुड केलं आहे. उदयनराजेंनीही हा सिनेमा आवडला आणि त्यांनी लुंगी परिधान केली होती का? अशीही चर्चा होते आहे. उदयनराजेंचा हा व्हीडिओ आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT