सोमय्यांच्या आरोपांची BMCने काढली हवा? 100 कोटी घोटाळ्यावर मोठा खुलासा

मुंबई तक

कोविड (Covid 19) काळात मुंबई महापालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) कोविड सेंटरच्या (covid centres) माध्यमातून 100 कोटी रुपये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Leader Kirit Somaiya) यांनी केलेला आहे. किरीट सोमय्यांकडून वारंवार हा मुद्दा अधोरेखित केला जात असून, मुंबई महापालिका प्रशासनाने (BMC) यासंदर्भात आता भलामोठा खुलासा केला आहे. बीएमसीने 11 मुद्द्यांच्या माध्यमातून किरीट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोविड (Covid 19) काळात मुंबई महापालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) कोविड सेंटरच्या (covid centres) माध्यमातून 100 कोटी रुपये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Leader Kirit Somaiya) यांनी केलेला आहे. किरीट सोमय्यांकडून वारंवार हा मुद्दा अधोरेखित केला जात असून, मुंबई महापालिका प्रशासनाने (BMC) यासंदर्भात आता भलामोठा खुलासा केला आहे. बीएमसीने 11 मुद्द्यांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना उत्तर देण्यात आलं आहे. 100 कोटींचा घोटाळा हा आरोपच निरर्थक असल्याचं बीएमसीनं म्हटलं आहे. (bmc rejects all allegations of corruption in covid centres)

किरीट सोमय्यांच्या आरोपांना मुंबई महापालिका प्रशासनाने काय दिलंय उत्तर?

कोविड विषाणू संसर्गाच्या कालावधीत लाखो नागरिकांच्या जीविताचे आरोग्य संरक्षण करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार व्यापक स्वरूपातील उपाययोजना सन २०२० ते २०२२ या दोन वर्षांत केल्या होत्या. त्यामध्ये राज्य शासनाच्या आदेशानुसार, विविध शासकीय यंत्रणांनी उभारलेल्या भव्य कोविड केंद्र अर्थात जंबो कोविड सेंटरमध्ये महानगरपालिकेने मनुष्यबळ पुरवठा करणे, याबाबीचा देखील समावेश होता.

या अनुषंगाने महानगरपालिकेने कोविड केंद्रासाठी मनुष्यबळ पुरवठ्यासाठी दिलेल्या कंत्राटामध्ये शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप महानगरपालिका प्रशासनावर करण्यात आले आहेत. तथापि, सदर आरोप हे योग्य नाहीत आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तूस्थितीदर्शक माहिती सादर करण्यात येत आहे. जनमानसात गैरसमज पसरू नये यासाठी सदर माहिती पुढील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

Remdesivir: लोकायुक्तांची BMC ला क्लीन चीट, सोमय्यांचे आरोप ठरले चुकीचे

हे वाचलं का?

    follow whatsapp