‘त्या खैरेला हे माहिती नसेल’; चंद्रकांत खैरेंचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून फुटले आणि शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद सुरू झाला. सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक संघर्ष बघायला मिळाला, मात्र आता दोन्ही गटांचे कार्यकर्ते रस्त्यांवर भिडताना दिसत आहेत. बुलढाण्यात असाच राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यावरून उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत असलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकास्त्र डागलं. चंद्रकांत […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून फुटले आणि शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद सुरू झाला. सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक संघर्ष बघायला मिळाला, मात्र आता दोन्ही गटांचे कार्यकर्ते रस्त्यांवर भिडताना दिसत आहेत. बुलढाण्यात असाच राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यावरून उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत असलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकास्त्र डागलं. चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला गायकवाडांनी प्रत्युत्तर दिलं.
झालं असं की, ३ सप्टेंबर रोजी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी काही तरुणांनी अचानक हल्ला केला.
या घटनेत शिवसेना संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. शिंदे गटानेच हा हल्ला केल्याचा आणि आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड याच्यासह कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला.
बुलढाणा : ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; आमदार पुत्रांकडून मारहाण झाल्याचा आरोप