सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवत पोलिसाचा वाढदिवस, गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापुरातल्या वेळापूर या ठिकाणी एका पोलीस कर्मचाऱ्याने कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम मोडून वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये ना सोशल डिस्टन्सिंग होतं ना कुणी मास्क लावला होता. या प्रकरणी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना माळशिरस तालुक्याल्या पोलिसाने त्याचा वाढदिवस थाटात साजरा केला. यावेळी कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत.

ADVERTISEMENT

एका बाजूला कोरोनाचा धोका वाढतो आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अशात माळशिरस तालुक्यातील वेळापूरमध्ये एका पोलिसाचा वाढदिवस दणक्यात आणि डिजे लावून साजरा झाला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गर्दी झाली होती. वेळापूर येथील पालखी मैदानावर हा वाढदिवस साजरा केला.

हे वाचलं का?

या संदर्भातला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसाचा वाढदिवस दणक्यात साजरा झाल्यानंतर कारवाई कोण करणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असणार. मात्र या घटनेची माहिती मिळताच या प्रकरणी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये एक पोलीस कर्मचारी, एक पोलीस अधिकारी आणि २० ते २५ जणांवर कोव्हिडच्या नियमांचं उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT