Anil Deshmukh यांच्यासाठी शेतकरी झाला जामिनदार… कोण आहे तो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज (बुधवारी) तुरुंगातून बाहेर आले आहेत. जवळपास एक वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून ते तुरुंगात होते. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, असे बडे नेते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहचले होते.

ADVERTISEMENT

कोण आहे देशमुख यांचे जामिनदार?

या सगळ्या घडामोडींदरम्यान चर्चा रंगली ती देशमुख यांच्यासाठी जामिनदार नेमकं कोण आहे? देशमुख यांच्यासाठी प्रेमचंद राठोड हे जामिनादार राहिले आहेत. विशेष सीबीआय न्यायधीश एस. एम. मेंजोगे यांनी राठोड यांच्या कागदपत्र पडताळणी करुन त्यांची वैधता तपासली.

राठोड हे देशमुख यांच्या काटोल मतदार संघातील कार्यकर्ते आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील माहूरखोरा या गावचे ते शेतकरी आहेत. मागच्या पंचवीस वर्षापासून ते अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

जामिनासाठीचे नियम काय सांगतात?

  • एखाद्या खटल्यातील आरोपीला जामिनदार होण्यासाठी स्वतःच्या नावाची स्थावर, जंगम मालमत्तेची कागदपत्रे, पगाराची पावती, आयकर परतावा प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदानाचे ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतात.

  • एका वेळी एकालाच जामीन राहता येतं.

  • ADVERTISEMENT

  • जामीन राहिलेल्या व्यक्तीच्या रेशन कार्डवर तो जामीनदार असल्याचा न्यायालयाचा शिक्का मारला जातो. त्यामुळे संबंधित खटला संपेपर्यंत तो दुसऱ्याला जामिनदार राहू शकत नाही.

  • ADVERTISEMENT

  • एकदा जामीन राहिल्यानंतर तो सहजरित्या काढून घेता येत नाही.

  • जामीन काढून घेण्यासाठी संबंधित न्यायालयाकडे अर्ज करून योग्य ती सर्व कारणे द्यावी लागतात. जामिनदाराचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालय त्यावर योग्य तो निर्णय घेतं.

  • खटला संपेपर्यंत आरोपीची न्यायालयीन जबाबदारी जामीनदारावर असते.

  • सुनावणीच्या काळात तो फरार झाला किंवा तारखांना हजर नसेल तर जामीनदाराला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो

  • ती व्यक्ती न्यायालयाने समन्स काढल्यानंतर उपस्थित न राहिल्यास जितक्या रकमेचा जामीन असेल तेवढी रक्कम न्यायालय जामिनदाराकडून वसुल करू शकते.

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT