Chandrayaan-3 Landing: विक्रम लँडर चंद्रावर उतरतानाचा प्रत्येक क्षण ‘इथे’ पाहता येईल Live
chandrayaan 3 landing latest update today : इस्रोची खरी कसोटी आता लागणार आहे. चांद्रयान 3 मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा 23 ऑगस्टला आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरणार आहे. त्या प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT

chandrayaan 3 landing vikram lander Landing live : चांद्रयान 3 नंतर अवकाशात झेपावलेले रशियाचे लुना-25 हे लँडर चंद्राच्या भूपृष्ठावर उतरण्यापूर्वीच कोसळले. त्यामुळे रशियाचे स्वप्न भंगले. पण, दुसरीकडे चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-3 सुरक्षितणे चंद्रावर पाऊल ठेवेल आणि मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पार करेल अशी आशा सगळ्यांना आहे. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पाच वर्षे सातत्याने मेहनत घेतली आहे. (Every moment of the landing of Chandrayaan-3’s Vikram Lander, will be able to watch live here)
चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्रावर उतरणार आहे. आणि ते बघणं अभूतपूर्व असा अनुभव तुमच्यासाठी असेल. प्रत्येकालाच बंगळुरुमधील मिशन कंट्रोल सेंटरमध्ये जाऊन या क्षणाचे साक्षीदार होणे शक्य नाही. त्यामुळे मग चांद्रयान-३ चे चंद्र लँडिंग कसे पाहायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल… तर इस्रोने स्वतः या अडचणीवर उपाय शोधला आहे. इस्रोने ट्विट केले आहे की, चांद्रयान-३ चे लँडिंग कुठे पाहता येणार याबद्दल…
तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून थेट पाहू शकता… थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.27 वाजता सुरू होईल…
इस्रो वेबसाइट >> https://www.isro.gov.in/
YouTube वर >> https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook वर >> https://www.facebook.com/ISRO
इस्रोने देशातील जनतेसाठी पाठवला खास संदेश
इस्रोने असे लिहिले आहे की, ‘अवकाशात शोध घेण्याची आमची तळमळीने आता एक मैलाचा दगड गाठला आहे. यामध्ये चांद्रयान-3 चे मोठे योगदान आहे. आम्ही आता त्याच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगची वाट पाहत आहोत. लँडिंगच्या यशाबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. त्याच्या यशामुळे भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगाला चालना मिळेल. अंतराळ संशोधनाच्या बाबतीत ते देशाला पुढे घेऊन जाईल.’