भाजप-शिवसेना काढणार ‘सावरकर गौरव यात्रा’; कसं असणार स्वरुप?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ आयोजित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ADVERTISEMENT
Bjp | Shivsena :
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantryaveer savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात शिवसेना-भाजपकडून (Shivsena-Bjp) निषेध केला जात आहे. आता याच निषेधाचा एक भाग म्हणून राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ आयोजित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केली. ते आज (सोमवारी) तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित होते. (Chief Minister Eknath Shinde announced that ‘Savarkar Gaurav Yatra’ will be organized across the state)
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू करत आहोत. जिल्हे, तालुके, विधानसभा मतदारसंघ, गावागावातून ही गौरव यात्रा काढली जाईल. यात आम्ही राहुल गांधी यांनी सावरकरांच्या वारंवार केलेल्या अपमानाचा आम्ही यामध्ये निषेध करु.
हे वाचलं का?
हेही वाचा : ‘Uddhav Thackeray तोंडाच्या वाफा काढू नका; हिंमत असेल तर…’ : बावनकुळेंनी ललकारलं
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्तेला लाथ मारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यामुळे फक्त भाषणात सावरकर जिवंत राहतील. कृतीमध्ये सावरकर दिसणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, तालुका, विधानसभा मतदारसंघ आणि गावागावातून एकीकडे आम्ही राहुल गांधी यांचा निषेध करु. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून सावरकरांनी केलेलं कार्य आम्ही पुन्हा समाजासमोर आणू आणि त्यांचा गौरव करु.
हेही वाचा : Rahul gandhi : खासदारकी रद्द, राहुल गांधींचा बदलला ट्विटर बायो, बघा काय लिहिलं?
उद्धव ठाकरेंनीही राहुल गांधींना जाहीरपणे सुनावलं :
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावमध्ये शिवगर्जना सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यांवरुन जाहीरपणे सुनावलं. राहुल गांधींंना माझं एक सांगणं आहे, सावरकर आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सोबत लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं ते येऱ्या गबाळ्याच काम नाही. या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फोडू नका. अन्यथा आपला देश हुकुमशाहीकडे गेलाच म्हणून समजा, असं ठाकरे म्हणाले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Uddhav Thackeray : सावरकरांवरुन राहुल गांधींना जाहीर सुनावलं, काय म्हणाले?
काय म्हणाले होते राहुल गांधी?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत भाष्य केलं आहे. नुकतचं लोकसभेमधून निलंबन झाल्यानंतरही राहुल गांधींनी सावरकर यांच्याविषयी भाष्य केलं. मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर कोर्टात माफी मागण्याच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी सावरकर नाही, मी गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत. त्यांच्या याच विधानावरुन राज्यात वातावरण तापलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT