शरद पवार ते मुख्यमंत्री ठाकरे… ममतादीदींनी देशातील बड्या नेत्यांना लिहलं पत्र!
कोलकाता: पश्चिम बंगालमधील दुसर्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे ममता यांनी विरोधी पक्षांना लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी संध्याकाळी नंदीग्राममधील निवडणूक प्रचार संपल्यानंतर टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज बिगर भाजप नेत्यांना वैयक्तिकरित्या पत्र पाठवलं […]
ADVERTISEMENT

कोलकाता: पश्चिम बंगालमधील दुसर्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे ममता यांनी विरोधी पक्षांना लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवारी संध्याकाळी नंदीग्राममधील निवडणूक प्रचार संपल्यानंतर टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज बिगर भाजप नेत्यांना वैयक्तिकरित्या पत्र पाठवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी या पत्रात म्हटले आहे की, लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकवटले पाहिजे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात असं म्हटलं आहे की, ‘मला असं वाटतं की, लोकशाही आणि संविधानावर भाजप जे हल्ले चढवत आहे त्याविरोधात एकजूट दाखवून प्रभावी संघर्ष दाखविण्याची वेळ आली आहे.’
भाजप देशात विष पसरवण्याचं काम करतंय – शरद पवारांचा घणाघात