पत्नीचा अश्लिल व्हिडीओ बनवून पतीकडून उकळले पैसे, आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
सोशल मीडियावर बायकोचे फोटो मॉर्फ करुन त्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करुन तिच्या पतीकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून ४५ हजार रुपये उकळले आहेत. राहुल यादवं असं आरोपीचं नाव असून फिर्यादीने त्याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी तरुण हा एका मोबाईल कंपनीच्या […]
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर बायकोचे फोटो मॉर्फ करुन त्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करुन तिच्या पतीकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून ४५ हजार रुपये उकळले आहेत. राहुल यादवं असं आरोपीचं नाव असून फिर्यादीने त्याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
फिर्यादी तरुण हा एका मोबाईल कंपनीच्या फायबर ऑप्टिकलमध्ये कामाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी राहुल यादवचा फिर्यादीला फोन आला. यावेळी आरोपीने फिर्यादीला आमच्याकडे सेक्स करण्यासाठी महिला उपलब्ध आहेत, तुम्हाला हवी असल्यास कळवा असं सांगितलं. फिर्यादीने या फोनला प्रतिसाद दिला नाही. यानंतर आरोपीने काही वेळात पुन्हा एकदा फिर्यादीच्या मोबाईलवर काही तरुणींचे फोटो व्हॉट्स अप केले. काही वेळाने आरोपेनी फिर्यादीला पुन्हा फोन करुन तुमच्या आवडीची मुलगी बुक केली असून हॉटेलमध्ये रुमही बुक झाल्याचं कळवलं.
हे वाचलं का?
इतकच नव्हे तर आरोपीने फिर्यादीला पेटीएम करण्यासाठी एक नंबरही पाठवला. परंतू आपण असं कोणतही काम केलेलं नसल्याचं फिर्यादीने सांगताच आरोपीने कोणतीही गोष्ट ऐकून न घेता रुम बुक केल्याचे १५ हजार पाठवण्याची धमकी दिली. तरीही फिर्यादीने पैसे न दिल्यामुळे आरोपीने फिर्यादीच्या पत्नीचे फेसबुकवरील काही फोटो मॉर्फ करुन त्याचा एक अश्लिल व्हिडीओ बनवला.
पंढरपूर : पत्नी आणि मुलीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला अटक
ADVERTISEMENT
हा व्हिडीओ फिर्यादीला पाठवून ४५ हजार रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल केला जाईल अशी धमकी दिली. सुरुवातीला बदमानीला घाबरुन फिर्यादीने आरोपीला ४५ हजार रुपये दिले. परंतू यानंतरही आरोपीकडून होणारा त्रास कमी होत नसल्यामुळे त्याने अखेरीस पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजारामपुरी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT