ताटं वाजवल्यामुळे देशात अवदसा आली ! प्रणिती शिंदेंची PM Narendra Modi यांच्यावर घणाघाती टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत घराबाहेर पडून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी नरेंद्र मोदींनी ताटं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आल्याची जहरी टीका प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

ADVERTISEMENT

“देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. ताटं वाजवल्यामुळे देशात अवदसा आली आहे. फक्त मतदानाच्या वेळी मोदी समोर येतात आणि मतं मागतात, याबद्दल त्यांना लाजही वाटत नाही”, अशा शब्दांमध्ये प्रणिती शिंदेंनी पंतप्रधान मोदींवर टीकेची तोफ डागली आहे. प्रणिती शिंदे सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी बोलत असताना प्रणिती शिंदेंनी EVM चा मुद्दा बाहेर काढला. पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटींग मशिनमध्ये जाऊन बसलंय. हाताला मतदान केलं तरीही ते भाजपला जातं. त्यामुळे याआधी शिक्का मारुन केलं जाणारं मतदानच योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. यावेळी बोलत असताना प्रणिती शिंदेनी मतदान प्रक्रियेत बदल करण्याचेही संकेत दिले. त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या या टीकेला आता भाजपमधून काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

Opposition March : ‘आम्हाला पाकिस्तानाच्या सीमेवर असल्यासारखं वाटत होतं’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT